कच्चा चिंचेची चटणी
कुकिंग सूचना
- 1
चटणी साठी लागणारे सर्व साहित्य जमा करून घ्यावे
- 2
चिंचेच्या वरील साले सोलून घ्यावी व चाकूने अर्धा तुकडा करून त्यातील चिंचोका काढून घ्यावा.
- 3
मिक्सरमध्ये चिरलेली चिंच कोथिंबीर हिरवी मिरची गुळ लसणाच्या पाकळ्या मीठ जिरे घालून घ्यावे
- 4
वरील मिश्रण थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यावे.
- 5
फोडणीसाठी तेल गरम करून जिरे मोहरी व कढीपत्त्याची फोडणी तयार करावी.
- 6
फोडणी बारीक केलेल्या चिंचेच्या मिश्रणात घालून एकजीव करून घ्यावे.
- 7
अशाप्रकारे कच्चा चिंचेची हिरवी चटणी तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11448086







टिप्पण्या