मिक्स कडधान्याचे कटलेट
#कडधान्य
कुकिंग सूचना
- 1
भिजवलेले सर्व कडधान्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे. थोडे जिरे, मिरच्या, लसूण, अद्रक, मीठ टाकून थोडे जाडसर दळून घ्यावे.
- 2
दळून घेतलेले भरड ताटात काढून घ्यावे. उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावेत. सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये, कोथिंबीर, गरम मसाला, थोडे लाल तिखट आणि थोडे मीठ घालावे. चांगले मिक्स करावे साहित्य.
- 3
एकजीव केलेल्या सारणाचे पॅटिसच्या आकाराचे गोळे करून घ्यावेत. नॉनस्टिक भांड्यात गरम झाल्यावर थोडे तेल सोडून पॅटिस शॅलो फ्राय करून घ्यावेत.
- 4
तयार झालेले गरमागरम पॅटिस सॉससोबत अथवा कोणत्याही चटणीसोबत सर्व्ह करावेत.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12047641












टिप्पण्या