राईस खीचू इन चायनीज स्टाईल (RICE KHICHU RECIPE IN MARATHI)

#स्टीम एक गुजराती व्यंजन नव्या अवतारात
राईस खीचू इन चायनीज स्टाईल (RICE KHICHU RECIPE IN MARATHI)
#स्टीम एक गुजराती व्यंजन नव्या अवतारात
कुकिंग सूचना
- 1
एका वाटीत सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि ओरेगानो एकत्र करून ठेवावे.एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवावे त्यात जिरे चवीनुसार मीठ आणि २ टीस्पून तेल घालावे उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून नीट ढवळून गॅस बंद करावा व त्यावर झाकण ठेवावे.
- 2
साधारण १० ते १५ मिनिटांनी ताटलीमध्ये पीठ काढून पीठ व्यवस्थित मळुन घ्यावे. हाताला थोडेसे तेल लावून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत आणि पुन्हा पाण्याचे आधण ठेवून ते गोळे वाफवून घ्यावेत (साधारण दहा मिनिटे फक्त मोदक जसे वाफवतो तसे)
- 3
आता एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यात चिरलेला लसूण घालून परतल्यानंतर त्यात सोया,चिली,टोमॅटो सॉस आणि ओरेगानो चे तयार केलेले मिश्रण घालावे.जरा परतल्यानंतर वाफवलेले राईसचे गोळे त्यात घालून ५ मिनिटे मोठ्या आचेवर जसं चायनीज करताना परततो तसे परतून घ्यावेत. झाले तयार आपले चायनीज फ्लेवर राईस खींचू. खींचू खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे चटणी घालून वरून तेल टाकून त्याचा आस्वाद गरम गरमच खायला द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या