उपवासाचे मेदूवडे (upwasache medu vada recipe in marathi)

#रेसिपीबुक week3
#नैवेद्य
उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी किंवा वरी तांदूळ फार फार तर बटाट्याची भाजी हेच माहीत असत पण सध्या यु ट्यूब मुळे बरेच नवीन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतात त्यातलाच हा एक प्रयोग सुफळ संपन्न

कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन्ही पीठ एकत्र करावी त्यात सर्व साहित्य घालून एकत्र करावे जितके पीठ असेल त्यापेक्षा एक कप जास्त पाणी घेऊन तयार मिश्रण पाण्यात घालून एक वाफ काढावी
- 2
वाफ काढून घेतल्यावर मिश्रण परातीत घेऊन पूर्ण थंड करावे तोपर्यंत खोबऱ्याची चटणी करून घ्यावी
- 3
मिश्रण थंड झल्यावर त्यात बटाटे किसून घालावे आणि मिश्रण एकत्र करावे तुपाचा हात घेऊन वडे थापून घेऊन गरम तेलात किंवा तुपात तळावे तळताना तेल कडक गरम करून घ्यावे वडे सोडताना गॅस पूर्ण मंद आचेवर करावा वडे सोडून 5 मिनिटे झाल्यावर परतावे लगेच चमचा लावू नये कढईत चिकटतात त्यामुळे सांभाळून तळावे गरमागरम वडे चटणी सोबत सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या