खान्देशी पध्दतीने मेथीची रस्सा भाजी (khandeshi methichi bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7
#सात्विक
रेसिपी नं 25
हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात.मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.
मेथीच्या पानांमध्ये लोह,कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने,व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे,तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.
मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते.रक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.अशी ही सर्वगुणसंपन्न मेथी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते तसाच एक खांन्देशी प्रकार म्हणजे वाटुन घाटुन मेथीची रस्सा भाजी किवा शेंगदाणे लावुन हिरव्या वाटणातील मेथीची रस्सा भाजी चला तर रेसिपी पाहुया.

कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम मेथी स्वच्छ करून पान काढून घ्या. स्वच्छ धुवून घ्या आणि चाळणीत पाणी निथळून घ्या.
- 2
आता वाटण तयार करून घेऊ भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- 3
वाटण तयार झाल की गॅस वर कढई ठेवून त्यात फोडणी साठी तेल घाला तेल छान गरम झाल की त्यात जीरे हिंग ची मस्त फोडणी करा व मेथी घाला आणि छान परतून घ्या.
- 4
मेथी छान शिजवुन घेतली की त्यात वाटलेला मसाला घाला व छान एकजीव करून घ्याव आवडीनुसार पाणी घाला.
- 5
चवीनुसार मीठ घालून एक उकळी आली की गॅस बंद करा तयार आहे खान्देशी पध्दतीने वाटुन घाटुन मेथीची रस्सा भाजी.
- 6
मस्त कोणत्याही भाकरी सोबत एकदम जबरदस्त लागते आम्ही बाजरी च्या भाकरी सोबत खातो एकच नंबर लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या