दाबेली बाइट्स - इनोव्हेटिव्ह फ्युजन स्टार्टर (DABELI BYTES RECIPE IN MARATHI)

#फ्युजन
कच्छी दाबेली खूप चविष्ट असते. पण स्टार्टर म्हणून खूप जास्त असते. म्हणून दाबेलीचा एक नवीन फ्युजन स्टार्टर बनवला. टोस्ट (चहाबरोबर खातो ते टोस्ट / रस्क ) वर दाबेलीची भाजी, चटण्या, बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे घातले. दाबेलीची भाजी, चटण्या तुम्ही आधी बनवून ठेवू शकता. टोस्ट छोटे असतील - एका घासात खाता येण्यासारखे - तर तसेच वापरा. जरा मोठे असतील तर पातळ धारदार सुरीने टोस्ट चे हव्या त्या मापाचे तुकडे करून घ्या. हेही आधीच करून हवाबंद बरणीत ठेवू शकता. आयत्या वेळी टोस्ट वर सगळं साहित्य घातलं की चविष्ट स्टार्टर तयार. एक तासभर हे स्टार्टर कुरकुरीत राहतात.

कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून गार करा. बटाटे सोलून किसून घ्या.
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात किसलेले बटाटे घाला. दाबेली मसाला घाला. मिश्रण एकत्र करून एकजीव करा. चांगलं गरम झालं की गॅस बंद करून मिश्रण गार करून घ्या. दाबेलीची भाजी तयार आहे. भाजीत चिरलेला कांदा, चवीनुसार गोड चटणी आणि तिखट चटणी घालून मिश्रण एकजीव करा.
- 3
टोस्ट मोठे असतील तर पातळ धारदार सुरीने टोस्ट चे हव्या त्या मापाचे तुकडे करून घ्या.सर्व्ह करताना प्रत्येक टोस्ट वर थोडं भाजीचं मिश्रण पसरावा. त्यावर थोडी बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे घाला.
- 4
चविष्ट दाबेली बाइट्स तयार आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- मॅक्सिकॅन सॅलड (Mexican salad recipe in marathi)
- व्हेज थाई करी आणि स्टिम राईस (veg Thai curry and steam rice in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)

टिप्पण्या