उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ओलं नारळाचा ब्राऊन भाग काढून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या।पॅनमध्ये एक टी स्पूनसाजूक तूप घालून त्यातबारीक केलेलं ओलं खोबरं व साखर घालून त्याला थोडं परतून घ्या।हे मोदकाचं सारण तयार आहे।
- 2
आता दुसऱ्या पॅनमधे दूध घेऊन त्यात तूप घालून त्याला एक उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ व मीठ ऍड करून त्याला एक वाफ येऊ द्यावी व ही मिश्रण झाकून दहा मिनिटांसाठी ठेवावे।
- 3
दहा मिनिटानंतर या ऊंड्याला चांगल्या तऱ्हेने मिळून याची सॉफ्ट उकड तयार करून घ्या।
- 4
आणि आता याचे मोदक करायला हा उंडा तयार आहे। उंड्यातून गोळा काढून त्याला हाताने पसरवत गोल पाती करा।त्या मध्ये सारण भरा।व हव्या त्या आकाराचा मोदक बनवू शकता।
- 5
स्टीमर मध्ये किंवा कढईमध्ये पाणी ठेवून त्यावर ताटात केळीचे पान तूप लावून ठेवून वर हे मोदक यावर दहा मिनिटांसाठी वाफेवर ठेवा। वरून केशराची काडी लावावी।
- 6
बघा किती सुंदर उकडीचे मोदक रेडी आहेत।
Keywords
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या