मसूर डाळीचे लाडू (masoor dal ladoo recipe in marathi)

झालं असं की सामानात चुकून १ किलो मसूर डाळ आली मुग डाळी ऐवजी... मग काय मिक्सरला रवाळ दळून पिठीसाखर बेसनलाडू सारखेच लाडू केले. छान झालेत... मुख्य म्हणजे रंग छान आला आहे..

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मसूर डाळ मिक्सरला रवाळ वाटून घ्या. हवे असल्यास रव्याच्या चाळणीने चाळून घ्या. म्हणजे जास्त मोठे दाणे वेगळे काढू शकता.
- 2
आता एका जाड बुडाच्या भांड्यात 4 टेबलस्पून तूप घालून मंद आचेवर चांगले भाजून घ्या. मिश्रण आधी छान केशरी रंगाचे असेल, पण व्यवस्थित भाजले की त्याचा रंग बदलून फिकट होईल.
- 3
आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या. कोमट किंवा थंड झाले की त्यात पिठीसाखर घालून चांगले एकत्र करा. आवडीनुसार वेलचीपूड आणि सुकामेवा घाला.
- 4
मिश्रणात थोडे थोडे तूप गरम करून घाला आणि लाडू वळून घ्या. हवाबंद डब्यात भरून ठेवा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या