पाणीपुरी (panipuri recipe in marathi)

पाणीपुरी हा पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. भारता मध्ये पाणीपुरी हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.पाणीपुरी या पदार्थाला काही ठिकाणी गुपचूप किंवा गोल-गप्पे म्हणतात.रवा, किंवा गव्हाच्या पिठा पासून डीप फ्राय केलेल्या गोल गोल पुऱ्या पेंड खजुराची चटणी, चिंचेची चटणी, शेव,बटाटे, पदिनाची चटणी यासोबत खाण्याची मजा काही और असते.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाणी पुरी साठी लागणारे सगळे साहित्य एकत्र ठेवले. पेंड खजूर पाण्यात चार तास भिजवून घेतले. पदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन घेतले. पेंड खजूर मध्ये साखर थोडे मीठ टाकून मिक्सर मधून वाटून घेतले. पदीना, कोथिंबीर,हिरव्या मिरच्या थोडे जिरे मिक्सर मधून वाटून घेतले.
- 2
आता पाणीपुरी साठी पाणी तयार करूया.दोन ग्लास पाण्या मध्ये दोन चमचे पाणीपुरी मसाला,एक चमचा चाट मसाला,एक चमचा आमचूर पावडर,पुदिनाची चटणी,बुंदी,टाकून पाणी पुरी चे पाणी तयार केले.पाणी पुरी चे पाणी अर्धा तास फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवूया.
- 3
आता बटाटे स्वच्छ धुवून घेतले. आणि कुकर मध्ये शिजवून घेतले व थंड करायला पाण्यात टाकले. बटाटे थंड झाल्यावर बटाट्याचे साले काढून घेतली.सोललेल्या बटाट्यामध्ये तिखट,मीठ,शेव,बुंदी, टाकली.
- 4
आता एका प्लेट मध्ये पाणीपुरी घेवून त्यामध्ये बटाट्याचे सारण टाकले,पुरी मध्ये बटाट्याचे सरण टाकून पेंड खजुराची चटणी पाणीपुरीचे तयार केलेले पाणी टाकले. पाणीपुरी आता तयार झालेली आहे.तसेच पाणीपुरी मध्ये बटाटा,दही,तिखट,चाट मसाला,मीठ, पेंड खजुराची चटणी व त्यावर बारीक शेव भिरकावून शेव पुरी तयार केली.आंबट गोड चटणी व पाणीपुरी साठी तयार केलेल्या पाण्यापासून तयार केलेली पाणीपुरी व शेवपुरी खाण्यासाठी सर्व्ह केली.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या