अंडा करी (anda curry recipe in marathi)

अंडा करी (anda curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम अंडी उकडून घ्या आणि त्याला उभ्या चिरा पाडून घ्या. कांदा टोमॅटो कापून दुसऱ्या ताटामध्ये सर्व खडा मसाला रेडी करून घ्या.
- 2
पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा त्यात प्रथम जिरं मिरं लवंग तेजपत्ता धणे चक्रीफुल परतून घ्या. नंतर कांदा ॲड करा आणि लालसर होईपर्यंत चांगलं परतून घ्या. त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घाला, ब्राऊन झाल्यानंतर शेवटी टोमॅटो ॲड करा. हे मिश्रण आता थंड करत ठेवा
- 3
त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडे तेल घ्या आणि उकडलेले अंडे हळद मीठ लावून फ्राय करून घ्या. या स्टेप मध्ये तुम्ही अंड्यांना दोन भागात कट करून सुद्धा फ्राय करू शकता. अशाने अंड्याच्या आतल्या भागाला ही चव येते आणि आणि करीमध्ये उकळून घेतल्यावर ही ते चविष्ट लागते.
- 4
थंड झालेले मिश्रण आता मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यामध्ये कोथंबीर ऍड करा.
- 5
वाटण तयार झाल्यानंतर एका पॅन मध्ये पुन्हा तेल गरम करा. आधी आले-लसूण पेस्ट चांगली परतून घ्या. इमेज मध्ये जरा माझी चूक झाली आहे मी हे वाटण नंतर ऍड केले. आलं लसूण चा खमंग वास सुटल्या नंतर वाटण ॲड करावे आणि मग त्यामध्ये लाल तिखट टाकून पुन्हा हा चांगले परतून घ्यावे. मिक्सरमध्ये चिकटलेले वाटण असेल तर त्यामध्ये थोडे पाणी टाकून पॅन मध्ये ॲड करावे.
- 6
त्यामध्ये आता अंडी मिक्स करून घ्या. दोन पिले पाणी ॲड करा. चवीनुसार मीठ आणि गरम मसाला ऍड करून एक चांगली उकळी येऊ द्या. वरून थोडी कोथिंबीर टाका. झणझणीत अंडा करी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या (2)