मालवणी हलव्याचे तिखलं (surmai tikhala recipe in marathi)

#GA4 #week5
Fish Post 2
मालवणी मच्छीच सार बवण्यासाठी विशेष करून समुद्रातील कर्ली ,बांगडे ,पापलेट,सुरमई,पेडवे,सौदाळे,हलवा असे अनेक मासे लोकप्रिय आहेत. दुपारच्या जेवणासाठी कोकणातील घराघरात मच्छीच्या साराची अगोदरच तयारी केली जाते. मच्छीच्या साराला तिखलं पण बोलतात. मासे नाही मिळाले तर त्याच वाटपात टोमॅटो घालून सार केले जाते. भात आणि सार खाण्यात मासे नसले तरी मच्छीचं सार खाल्ल्या सारखे वाटते.

कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम ब्याडगी मिरच्या,धणे,त्रिफळं पाण्यात अर्धा एक तास भिजवून ठेवा. मग हलव्याचे तुकडे करून त्यांंना ५ मिनिटे मीठ लाऊन ठेवा. ५ मिनीटांनी मासे स्वच्छ धुवून घ्या. त्यांना लिंबाचा रस लाऊन झाकून ठेवा. एक तासाने भिजत घातलेले साहित्य आणि टोमॅटो एकत्र वाटून घ्या. बारीक पेस्ट करून घ्या. बाजूला काढून ठेवा. आता ओलं खोबरं आणि हळद एकत्र वाटून त्याची पण पेस्ट करून घ्या.
- 2
एक तासाने भिजत घातलेले साहित्य आणि टोमॅटो एकत्र वाटून घ्या. बारीक पेस्ट करून घ्या. बाजूला काढून ठेवा. आता ओलं खोबरं आणि हळद एकत्र वाटून त्याची पण पेस्ट करून घ्या.
- 3
एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर लसूण आणि कडिपत्त्याची फोडणी करून घ्या. लसूण खरपूस भाजला कि त्यात मिरच्या आणि टोमॅटोचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- 4
वाटण चांगले परतल्यावर खोबऱ्याचे वाटण टाकून परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला. मग गरम पाणी घालून ५ मिनिटे उकळी काढा.
- 5
साराला उकळी आली कि त्यात माशाचे तुकडे घाला. कोकमं टाका आणि झाकण ठेवून माशाचे तिखलं ५ मिनिटे शिजवून घ्या. मग गरम गरम तिखलं भाकरी किंंवा पोळीबरोबर सर्व्ह करा. कोकणात भात आणि माशाचं तिखलं हे मुख्य अन्न आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या