खमण ढोकळा (dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कूकरची शिट्टी काढून कूकर मंद गॅसवर गरम करय ठेवा. १ कप बेसन पिठ,२ चमचे रवा,२ लहान चमचे साखर, आले मिरची पेस्ट, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तेल, चवीपुरते मीठ हे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात पाव कप दही घाला. मिश्रणात २ टिस्पून इनो घालून एकाच दिशेने हलवत रहा.
- 2
मिश्रण फसफसायला लागले कि तेल लावलेल्या कूकरच्या भांड्यात ओतून घ्या. भांडे प्रीहिट केलेल्या कूकरमध्ये ठेवा. १५ मिनिटे ढोकळ्याचे मिश्रण वाफवून घ्या.
- 3
जोवर ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करू घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्या. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करा.
- 4
एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करा.. हे मिश्रण फोडणीत घाला.
- 5
१५ मिनीटांनी गॅस बंद करा. १-२ मिनीटांनी भांडे बाहेर काढा. ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरवा.
- 6
गरम गरम ढोकळा हिरवी चटणी किंवा खजूरच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या