वेन /खारा पोंगल (ven/khara pongal recipe in marathi)

#दक्षिण, वेन/खारा म्हणजेच मूग पोंगल, ही पारंपरिक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आणि टिफिन रेसीपी आहे की जी बनवायला अगदी सोप्पी,स्वादिष्ट आणि सगळ्यात महत्वाचे सात्विक आहे. ही रेसीपी मूग डाळ,तांदूळ आणि थोडीशी तिखट अशी टेस्ट आहे आणि प्लेन सांबार व ओल्या नारळाच्या चटनी बरोबर खूपच छान लागते.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून त्यात मीठ व हिंग घालून मऊ खिचडी सारखी शिजवून घ्यावी हळद पाउडर घालू नये
- 2
आता छान मऊ खिचडी शिजल्यावर गॅसवर काढाई ठेवून बारीक गॅसवर तूप घालून थोडे गरम झाल्यावर त्यात जीरे,आले, काळी मिरी, कढीपत्ता आणि काजू घालून खमंग फोडणी करून झाल्यावर त्यात शिजलेली मऊ खिचडी घालावी व सर्व एकत्र मिक्स करून घ्यावे जर खिचडी थोडी घट्ट वाटत असल्यास त्यात लागेल तसे गरम पाणी घालून आणि मिठाची चव बघून मीठ घालून सर्व एकत्र मिक्स करून झाकण लावून 5 मिनिटे बारीक गॅसवर मऊ शिजवून घ्या
- 3
आणि गरम गरम वेन /खारा पोंगल प्लेन सांबार आणि ओल्या नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या