कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)

#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट
कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामान एकत्र करून घ्या.
- 2
काजू आणि बदाम थोडे भाजून घ्या.
- 3
काजू व बदाम यांची मिक्सर मध्ये पावडर करून घ्या. व त्यामध्ये मिल्क पावडर आणि पिठीसाखर मिक्स करा.
- 4
आता वरील मिश्रणाचे तीन समान भाग करून घ्या. एका भागामध्ये ग्रीन कलर मिक्स करा, त्याचा 2 टीस्पून दूध घालून गोळा करून घ्या (दुध थोडे थोडे करून घालावे नाहीतर गोळा अगदी पातळ होईल).
- 5
दुसर्या भागामध्ये कोको पावडर घालून त्याचा दूध घालून गोळा करून घेणे.
- 6
तिसऱ्या भागामध्ये कट केलेले ड्रायफूट म्हणजे पिस्ता काजू बदाम यांचे तुकडे तसेच पिवळ्या रंगाचे दोन थेंब टाकून त्याचाही वरीलप्रमाणे गोळा करून घ्यावा.
- 7
वरील गोळ्याच्या आयताकृती पोळ्या बटर पेपर वर तूप लावून लाटून घ्या.
- 8
आता फोटो मध्ये जशी कट केली आहे तशी कट करून घ्या.
- 9
सर्वात आधी पिवळ्या पोळीचा रोल करा मग तो हिरव्या पोळीवर ठेवा व पुन्हा गोल करा आता तो रोल चॉकलेटी पोळीवर ठेवून त्याचा रोल करा.
- 10
मग त्यावर चांदीचा वर्ख लावून घ्या. त्यानंतर तो रोल अलुमिनिम फॉईल मध्ये गुंडाळून 5 तास फ्रिज मध्ये ठेवा. व नंतर कट करा. तुमचा कसाटा ड्रायफ्रूट डीलाईट खाण्यासाठी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
- हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi)
- मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
- हिरव्या मिरचीचा खर्डा (hirvya mirchi cha kharda recipe in marathi)
- हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)




















टिप्पण्या