भगरीचे कटलेट (bhagriche Cutlets recipe in marathi)

#fr भगरीचे कटलेट# आज मी माधुरी ताईचे ही उपवासाची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केलेली आहे. शिल्लक राहिलेल्या भगरीचे कटलेट थोडा बदल केले आहे. खूपच कुरकुरीत झाले आहे. गरम गरम खायला छान लागतात.धन्यवाद माधुरी ताई!

कुकिंग सूचना
- 1
एक वाटी शिल्लक राहिलेली भगर घ्यावी. चार बटाटे उकळून घ्यावे.
- 2
बटाट्याची साले काढून घ्यावी.शेंगदाण्याचा कूट करून घ्यावा.
- 3
शिल्लक भगरीमध्ये उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जीरे पावडर, साबुदाणा पीठ,मिरे पावडर,मीठ टाकावे.कटलेट चे रोल करू. घ्यावे.
- 4
तेल गरम करायला ठेवावे.तेल गरम झाल्यावर कटलेट टाकावे.आणि दोन्ही बाजूने गुलाबी रंग येईपर्यंत डीप फ्राय करावे.
- 5
कटलेट कुरकुरीत होईपर्यंत तळावे. आणि प्लेट मध्ये काढून घ्यावे.
- 6
अश्या प्रकारे भगरीचे कुरकुरीत कटलेट तयार झाले आहे. गरम गरमच खावे खूप छान लागतात. चटणी किंवा ताकाबरोबर सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (7)