होळी स्पेशल पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr पुरणपोळी
कुकिंग सूचना
- 1
दुपारी परण करायचं असेल तर चणाडाळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास भिजत घालणे.
- 2
मग सहा तासांनी आधीचे पाणी काढून स्वच्छ पाणी घालून डाळ मोठ्या गॅसवर शिजायला ठेवणे. साधारण अर्धा ते पाऊण तासात डाळ शिजते. त्याआधी कणीक आणि मैदा चाळून कणीक भिजवून घेणे. कणिक भिजवताना भरपूर तेल लागते.
- 3
कणीक भिजवून अर्धा तास बाजूला ठेवणे.
- 4
- 5
डाळ शिजल्यावर एक रोळी घेऊन त्याखाली एखादं पातेलं घेऊन त्यावर दोषी ठेवून डाळ उपसायची. त्याचा सगळा कट त्या पातेल्यात उतरतो.
- 6
जेवढी डाळ घेतली असेल तेवढाच गूळ घ्यावा किंवा त्या पेक्षा थोडा पाव कप गूळ कमी घ्यावा आणि पुरण शिजायला ठेवावे.
- 7
पुरण शिजल्यानंतर त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालून व्यवस्थित मिक्स करावे
- 8
मग पिठाचे उंडे करून त्यात पुरण भरून पोळ्या लाटाव्यात. आणि तव्यावर खरपूस भाजून घ्याव्यात.
- 9
मग पोळ्या दूध तूप आणि कटाची आमटी या बरोबर सादर कराव्यात
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या