मूगडाळ ढोकळा (moong dhokla recipe in marathi)

#pcr #Pressure_Cooker_Recipes
#मूगडाळ_ढोकळा...
सर्व डाळींमध्ये पचायला अतिशय हलकी अशी मूगडाळ...त्यामुळे मूगडाळ आहारात असणं गरजेचं आहे..मूगडाळ आपण विविध प्रकारे आपल्या आहारात वापरु शकतो..मूगडाळ आमटी,मुग डाळ चटका,मुगडाळ झुणका,मुगडाळ पुरणपोळी,भाज्यांमध्ये मुगाचीडाळ,सूप,कढण,ढोकळा..असे विविध प्रकार आहेत..तर अशी ही सुपाच्य मुगाची डाळ...स्वभावाने अतिशय गरीब...कोणालाही त्रास देणार नाही चणाडाळीसारखी....म्हणजे तब्येतीला हो...😀
चला तर मग आपण आज हलका फुलका चमचमीत मुगडाळ ढोकळा करु या..

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मूग डाळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवा आणि इकडे सर्व ढोकळा याचे साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या
- 2
आता भिजवलेली मुगडाळ डाळ मिसळून घ्या आणि त्यामध्ये आलं मिरची लसूण थोडी कोथिंबीर घालून थोडं पाणी घाला आणि मिक्सर वर वाटून घ्या आता हे मिश्रण एका वाडग्यात घेऊन त्यामध्ये साखर मीठ हळद थोडं तेल घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या एकीकडे ज्या भांडयात आपण ढोकळा करणार आहोत त्याच्या तळाला तेल लावून ग्रीस करून घ्या आणि कुकर मध्ये पाणी घालून पाणी गरम करायला ठेवा.
- 3
आता वरील मिश्रणात इनो घाला आणि त्यावर चमचाभर पाणी घाला आणि मिश्रण भरभर एका दिशेने ढवळून घ्या आणि ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओता. आणि हे भांडे कुकर मध्ये ठेवा कुकरची शिट्टी काढून घ्या आणि कुकर मध्ये बारा ते पंधरा मिनिट शिजवून घ्या
- 4
नंतर ढोकळ्या मध्ये सुरी घालून ढोकळा शिजला का नाही ते तपासून घ्या ढोकळा शिजला असेल तर डबा बाहेर काढून थंड करा.थंड झाल्यावर सुरी ढोकळ्याच्या बाजूने गोलाकार फिरवा व कडा सैल करुन घ्या..आणि ढोकळा ताटात उपडा करुन घ्या..परत दुसर्या ताटलीत सुलटा करा.एका कढल्यात तेल,मोहरी, हिंग,कडिपत्ता,slit केलेल्या मिरच्यांची खमंग फोडणी करुन ढोकळ्यावर घाला..
- 5
झाला आपला चमचमीत मूगडाळ ढोकळा तयार.. हा ढोकळा डिशमध्ये सर्व्ह करा.
- 6
- 7
- 8
- 9
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)