शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenga chi amti recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenga chi amti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तूरीची डाळ हळद घालून शिजवून घ्यावी. मग एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावे त्यात थोडे मीठ घालून शेंगा शिजवून घ्याव्यात. कांदा बारीक चिरुन घ्यावा. फोडणी करुन त्यात कडीपत्ता व कांदा परतून घ्यावे.
- 2
मग शिजवलेली डाळ फोडणीत घालावी. उकडलेल्या शेंगा पाण्यासकट डाळीत घालाव्यात.
- 3
सर्व मसाले गोडा मसाला, धनाजीरा पावडर व लाल तिखट घालावे। चिंच व गुळ घालावे आमटीला एक उकळी आणावी व वरुन कोथिंबीर घालावी.ही आमटी गरम भात किंवा पोळी बरोबर छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15062951









टिप्पण्या