चिकन शेजवान फ्राइड राइस (chicken Schezwan fried rice recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
चिकन शेजवान फ्राइड राइस (chicken Schezwan fried rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आलं लसूण मिरची कोथिंबीर मीठ,हळद घालून चिकन मॅरीनेट केले.अर्ध्या तासाने पिसेस पॅन मध्ये १ टेबलस्पून तेलात फ्राय करून शिजवले.नंतर त्याचे लांबट काप केले.
- 2
२ अंड्याचे फक्त चवीपुरते मीठ घालून आम्लेट करूनं घेतले.त्याचे छोटे तुकडे केले.
- 3
भात मोकळा शिजवून घेतला.भाज्या चिरून घेतल्या.आलं लसूण बारीक क्रश करून घेतले.
- 4
पॅन मध्ये तेल घालून त्यात क्रश केलेले आलं लसूण घातले.नंतर पातीचा कांदा,बाकी सर्व भाज्या घालून परतले.ऑमलेट चे पिसेस आणि श्रेडेड चिकन घालून मिक्स केले. गॅस ची आच मोठी च ठेवली.
- 5
त्यात शिजवलेला भात सगळे सॉस,चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स केले.
- 6
तयार राइस सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतला.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15067724















टिप्पण्या (2)