शाही व्हेज पुलाव (shahi veg pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वछ धुवून अर्धा तास भिजत ठेवा. नंतर पुलाव बनवण्यास घ्या त्यासाठी एका बाजूला एका वाटी मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
- 2
दुसऱ्या बाजूला एका कूकर मध्ये तेल घाला त्यात काजू, मनुके, वेलदोडे, मिरे, जीरे, मिरच्या, आल्याचे काप, चक्रीफूल, दालचिनी, तमालपत्र घालून छान परतून घ्या.आता त्यात वटाणा, स्वीट कॉर्न घाला.
- 3
आता त्यात तांदूळ घाला, तांदूळ छान परतून घ्या.गरम पाणी घाला आणि मीठ घाला थोडं हलवून आता कुकर चे झाकण लावून मेडीयम फ्लेम वर 2 शिट्ट्या काढून घ्या. कुकर नॉर्मल टेम्परेचर ला आला कि उघडून तूप घाला आणि टुटी फ्रूटी ने सजवा.
- 4
सुंदर असा शाही व्हेज पुलाव तयार आहे.बुंदी रायता आणि मसाला पापड सोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15264202














टिप्पण्या (3)