एग चीली (egg chilli recipe in marathi)

तुम्हांला Non-Veg डिशेस आवडत असतील तर ही Egg चिल्ली तुम्हांला नक्की आवडेल. तसं इंडो चायनीज recipes शिजायला वेळ लागत नाही, पण त्याच्या तयारीसाठी खूप वेळ लागतो, पण ह्या डिशसाठी जास्त वेळ लागत नाही.
एग चीली (egg chilli recipe in marathi)
तुम्हांला Non-Veg डिशेस आवडत असतील तर ही Egg चिल्ली तुम्हांला नक्की आवडेल. तसं इंडो चायनीज recipes शिजायला वेळ लागत नाही, पण त्याच्या तयारीसाठी खूप वेळ लागतो, पण ह्या डिशसाठी जास्त वेळ लागत नाही.
कुकिंग सूचना
- 1
अंडी उकडून घेऊन त्याचे छोटे-छोटे पीस करून घ्या.
- 2
प्रथम एका भांड्यात कॉर्नफ्लॉवर, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि पाणी घेऊन कोटिंग बनवून घेऊ.
- 3
एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे व तेल तापले की त्यात अंड्याचे घोळून घेतलेले काप तळून घ्यावे.
- 4
ग्रेव्ही तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, आल्याचे तुकडे, कांदा, सिमला मिरची घालून परतून घेऊन, त्यात काळी मिरी पावडर, काश्मिरी मिरची पावडर, काॅर्न फ्लोअर, शेजवान चटणी, सोया सॉस, टोमॅटो सॉस घालून मिक्स करून घ्यावे.
- 5
आता फ्राय केलेले अंड्याचे पीस तयार केलेल्या ग्रेव्ही मसाला मध्ये छान मिक्स करून घ्या.
- 6
अशा प्रकारे आपली अंडा चिली रेसिपी तयार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी असे स्ट्रीट फूड तुम्हाला नक्कीच चाखता येतात. पण आपण घरीही अगदी सोप्या पद्धतीने चवीच्या डिशेस बनवू शकतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या (3)