व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)

व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी.
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी बासमती तांदुळ स्वच्छ धुवुन 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा, नंतर एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात सर्व खडे मसाले, पुदिना-कोथिंबीर, लिंबाची फोड,अर्धा टीस्पून मीठ टाकुन उकळी आल्यावर भिजवलेले बासमती तांदूळ टाकून भात करून घ्या.
- 2
पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन फ्लॉवर,गाजर,फरसबी,पनीर,बटाटा फ्राय करून घ्या.
- 3
पातेल्यात तेल गरम करून घेऊन कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता त्यात हिरवी मिरची,आलं-लसूण पेस्ट,टोमॅटो,दिलेले सर्व मसाले टाकून हे सर्व छान परतून घ्या.
- 4
त्यानंतर त्यात फ्राय केलेला सर्व भाज्या, चवीनुसार मीठ, थोडेसे पाणी टाकून ग्रेव्ही तयार करून घ्या. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यात फ्राय केलेल्या पनीरचे काप टाका आणि व्यवस्थित मिक्स करून एक मिनिट वाफ काढा.
- 5
आता मोठ्या पॅनमध्ये तूप टाकून भाजीचा थर लावून द्या.
त्यावर भाताचा थर लावून पुदिना,कोथिंबीर, तळलेला कांदा टाकून, थोडेसे तूप सोडा. परत वरती भाजीचा थर लावून सेम तसेच करा. - 6
शेवटी भाताचा थर आल्यानंतर पुदिना,कोथिंबीर,तळलेला कांदा, फ्राय केलेले पनीर चे तुकडे,तूप,फूड कलर टाकून 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
- 7
तयार झालेली गरमागरम बिर्याणी रायता,सलाड सोबत सर्व्ह करताना वरून फ्राय केलेले पनीरचे तुकडे आणि काजू टाकून wa wa एकदम Yammi.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चॉकलेट कोल्ड केक (chocolate cold cake recipe in marathi)
- मालवणी मासे कालवण (malvani mase kalvan recipe in marathi)
- लसुणी पालक पनीर (lasuni palak paneer recipe in marathi)
- कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)
- जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
















टिप्पण्या