पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)

पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ग्रेव्ही साठी कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेणे.आता गॅस वर कढई ठेवून त्यात 1 चमचा तेल घालून कांदा, लसूण, आले छान सोनेरी रंगावर भाजून घेणे. आता त्यात टोमॅटो, काजू घालून टोमॅटो अगदी मऊ होई पर्यंत परतून घेणे. थंड करून घेणे. लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र भाजून घेणे. आता मिक्सर पॉट मध्ये कांदा, टोमॅटो, खडे मसाले घालून घेणे. त्यातच लाल तिखट, रंगाचे तिखट घालून ग्रेव्ही करून घेणे.
- 2
आता गॅस वर कढई ठेवून त्यात बटर किंवा तेल घालावे. गरम झाले कि त्यात जीरे घालावेत. ते फुललेकी त्यात तयार ग्रेव्ही घालून छान तेल सुटे पर्यंत परतून घेणे. मिक्सर पॉट मध्ये थोडे पाणी घालून ते त्या ग्रेव्ही मध्ये घालावे. आता त्या मध्ये आपल्या आवडीनुसार सगळे मसाले घालून घेणे.मस्त मसाले त्या ग्रेव्ही मध्ये 4-5 मिनिट शिजवून घेणे.
- 3
आता ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणे गरम पाणी घालावे. व त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी घालून एकत्र करून घेणे.आता त्यात फ्रेश क्रीम घालावे.झाकण ठेवून छान 5 मिनिट शिजवून घेणे.
- 4
आता पनीर स्वच्छ धून घेणे. त्यातील साधारण 1/2 कप पनीर खिसुन घेणे. व राहिलेले पनीर चे आपल्या आवडीनुसार तुकडे करून घेणे.आता खिसलेले पनीर त्या ग्रेव्ही मध्ये घालून छान एकत्र करून घेणे. थोडे से खिसलेले पनीर बाजूला सर्व्ह करताना घालण्यासाठी बाजूला ठेवणे.
- 5
आता या मध्ये पनीर क्यूब घालावेत. व सगळे एकदा हलवून घेणे. झाकण ठेवून 5 मिनिटे हे पनीर ग्रेव्ही मध्ये शिजवून घेणे. जास्त शिजवू नये. आता गॅस बंद करावा. मस्त टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार भाजी तयार आहे.
- 6
मस्त नान, रोटी, जिरा राईस सोबत सर्व्ह करावे. सर्व्ह करताना वरून खिसलेले पनीर, कोथींबीर घालून देणे. सोबत कांदा, काकडी, टोमॅटो असे सॅलड द्यावे.
- 7
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या (9)