दूधी भोपळा भाजी with मूँग डाळ (dudhi bhopla bhaji moong dal bhaji recipe in marathi)
दूधी भोपळा भाजी with मूँग डाळ (dudhi bhopla bhaji moong dal bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम दूधी भोपळयाचे साल काढून घेवूया
नंतर त्याचे छोटे छोटे लांब लांब पीस करून घेवू आणी पाण्यानी स्वच्छ धुवूण घेवू. - 2
तसेच मूँग डाळ सुद्धा घूवून घेवू. आता सर्व प्रथम पँन गँसवर ठेवू तेज आचेवर त्यात तेल गरम करून त्यातजीरे आणी मोहरी तडतडून घेवु.त्या आधी मिक्सर मधून अदरक लसून पेस्ट आणी हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेवू.
- 3
आता या तडतडत्या जीरे आणी मोहरी मधे अदरक लसून पेस्ट आणी हिरवी मिरची पेस्ट टाकू आणी छान मिक्स करून घेवू.आता या मिश्रणात हिंग,हळद, धने पूड आणी मीठ मिक्स करून घेवू आणी टमाटर चे छोटे छोटे टुकडे करून ते ही मिक्स करून हे मिश्रण 1-2 मिनिट पर्यत मंद आचेवर शिजवून घेवू.आता या मिश्रणात मूँग डाळ मिक्स करून 2-3 मिनिट पर्यत मंद आचेवर शिजवून घेवू.
- 4
आता त्यात दूधी भोपळयाच्या फोडी मिक्स करूँ आणी मंद आचेवर भाजीला 15- 20 मिनिट पर्यत शिजवून घेवू.भाजी शिजली की तेल सोडायला सूरवात करते. तेल सोडायला सूरवात झाली की भाजी शिजली महणून समजावे
आता आमची दूधी भोपळा with मूँग डाळ भाजी तयार आहे. हिला चपाती किंवा पराठया सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes








टिप्पण्या