खजुर -बिस्किट मोदक (khajur biscuit modak recipe in marathi)

Chhaya Chatterjee @chhaya14
झटपट होणारे मोदक
#gur
खजुर -बिस्किट मोदक (khajur biscuit modak recipe in marathi)
झटपट होणारे मोदक
#gur
कुकिंग सूचना
- 1
खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. बिस्किटे पण मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावे.
- 2
कढईत खजूर आणि मलाई एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवून द्यावे. चमच्याने सतत हलवत रहावे
- 3
नंतर त्यात साखर घालावी आणि बिस्किटचा चुरा घालावा
- 4
मिश्रण एकजीव झाले की गॅस बंद करून दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यावे व थंड करण्यासाठी ठेवून द्यावे.
- 5
मिश्रण थोड थंड झाल्यावर हाताला तूप लावून चांगले मळून घ्यावे व मोदकाच्या साच्यात तूप लावून त्यात मोदक करून घेणे.
- 6
साखर नाही घातली तरी चालेल. मोदकाच्या ऐवजी रोल पण करू शकतात. मोदक तयार झाल्यावर फ्रीजमध्ये एअर टाईट कटेनरमधये किंवा फाॅईल मध्ये भरून सेट करायला ठेवून दयावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15516869












टिप्पण्या