व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)

व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नूडल्स गरम पाण्यात 2-3 मिनिटे शिजवून घेणे. त्यातील पाणी चाळणीतून निथळून काढणे. नूडल्स चिकट होऊ नये म्हणून त्या वर गार पाणी घालून एका प्लेट मध्ये पसरून ठेवणे.
- 2
आता एका प्लेट मध्ये कांदा, कोबी, शिमला मिरची, कांदा पात आपल्या आवडीनुसार उभी चिरून घेणे. आले लसूण पेस्ट करून घेणे.
- 3
आता गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घालावे. गॅस मोठा ठेवावा. आता त्या मध्ये चिरून घेतलेले भाज्या घालून घेणे. आता त्या मध्ये आलेलसूण पेस्ट घालून मोठया गॅस वर 2-3 मिनिटे परतून घेणे. आता त्या मध्ये आपल्या आवडीनुसार सगळे सॉस घालून छान परतून घेणे.
- 4
आता या मध्ये शिजवून घेतलेले नूडल्स मोकळे करून घालणे. चवीनुसार मीठ घालावे. व छान सगळे नूडल्स अलगद त्या भाज्या मध्ये एकत्र 3-5 मिनिटे परतून घेणे. गॅस मोठा ठेवून वरून कांदा पात घालावी. गॅस बंद करावा.मस्त व्हेज हक्का नूडल्स तयार झाले. गरम गरम शेजवान चटणी किंवा मन्चुरिअन सोबत सर्व्ह करावे. असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes









टिप्पण्या