साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

#सात्विक_रेसिपी
#कुकस्नॅप_चॅलेंज
Bhagyashree Lele ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी मी सात्विक रेसिपी म्हणून कुकस्नॅप केली आहे.
उपवास असल्यावर साबुदाण्याचे पदार्थ हमखास केले जातात. साबुदाणा वडा, खिचडी, खीर, थालिपीठ इ. यापैकी मी घरातील लहान मोठे सगळ्यांच्याच खूप आवडीचे साबुदाणे वडे केले. खूप छान खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे खायला फारच मजा आली. त्याचबरोबर दाणे खोबरं चटणी पण छानच लागली. सोबत एक ग्लासभर ताक म्हणजे पर्वणीच.

कुकिंग सूचना
- 1
रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेऊन त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, तिखट पूड, मीठ, साखर घालून मिक्स केले.
- 2
उकडलेले बटाटे सोलून कुस्करून साबुदाण्याच्या मिश्रणात घालून मिक्स केले. मग त्या मिश्रणाचे गोल चपटे वडे केले.
- 3
कढई मधे तेल घालून त्यात साबुदाणे वडे खरपूस तळून घेतले. मग जास्तीचे तेल टिपण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवले.
चटणी बनवण्यासाठी: भाजलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर आणि दही मिक्सर मधून बारीक वाटून चटणी बनवली. - 4
एका प्लेटमधे गरमागरम खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे, खोबर्याची चटणी आणि ताक सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या