घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

#ccs
#कुकपॅडची_शाळा
#सत्र_दुसरे
#घेवडा_भाजी
'उपटूनी वेल घेवड्याचा' हे दत्तगुरूंचे गाणं खूप प्रसिद्ध आहे. दत्तगुरुंना ही घेवड्याची भाजी खूपच आवडीची आहे असे म्हणतात. म्हणून शक्यतो गुरुवारी ही भाजी नैवेद्यासाठी बनवतात. या भाजी मधे कांदा लसूण काहीही न घालता अगदी थोडेच मीठ मसाले घालून पण ही भाजी खूपच चविष्ट लागते.

कुकिंग सूचना
- 1
घेवड्याच्या शेंगा धुवून त्यातील दोरे काढून तुकडे करुन घ्यावे. यामधले दाणे पण भाजी करताना बरोबरच घालावे.
- 2
टोमॅटो बारीक चिरुन घ्यावा आणि भाजीमधे घालायचे मसाले एका प्लेटमधे काढून घ्यावे
- 3
कढई मधे तेल घालून त्यात फोडणी साठी मोहरी, जीरे घालून ते तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतावा, मग त्यात वरील मसाले, मीठ, साखर घालावी. घेवड्याच्या शेंगांचे तुकडे घालून परतून मिक्स करावे आणि थोडे पाणी घालून मग झाकण लावून एक शिटी काढून भाजी शिजवून घ्यावी. भाजी शिजताना खूपच मस्त वास दरवळत असतो.
- 4
छान गरमागरम भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या