रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा, दही एका बाउल मध्ये घेणे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. व लागेल तसे पाणी घालून मध्यम असे बॅटर तयार करून घेणे.15 मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
आता इडली पात्रात पाणी घालावे. व इडली प्लेट ला तेल लावून घेणे. आता हे बॅटर पुन्हा डावाने सारखे करावे. खूप घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालावे. खूप पातळ बॅटर करू नये. आता या मध्ये इनो घालावा व वरून एखादा चमचा पाणी घालावे. व पुन्हा बॅटर हलवून घेणे. बॅटर फेरमेंट होऊ लागते.
- 3
आता तेल लावलेल्या प्लेट मध्ये बॅटर घालावे. सगळ्या प्लेट पात्रात ठेवून झाकण लावावे. मध्यम आचेवर 15 मिनिट वाफवून घेणे. नंतर थंड झाले कि इडली पात्रातून हलक्या हाताने चमच्याने इडली काढून घेणे. मस्त हलकी आणि जाळीदार इडली तयार होते.
- 4
मस्त झटपट अशी रवा इडली खाण्यासाठी तयार होते. थंडी च्या दिवसात इडली पीठ लवकर फेरमेंट होत नाही. त्या वेळेस असे झटपट रवा इडली करता येते. मस्त गरम गरम इडली चटणी सोबत सर्व्ह करावी. खूप छान होतात
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या (2)