खानदेशी शेव भाजी (khandesi sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1
# खानदेशी शेव भाजी…
नवीन ई-बुक चायलेंज, आठवडा पहिला यासाठी जे की वर्ड्स दिले आहे. त्यापैकी मी शेव भाजी हा प्रकार निवडला आहे.
भारतात सर्वत्र शेव भाजी हा प्रकार फेमस आहे. विशेष करून महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. विशेष करून खानदेश या भागांमध्ये शेव भाजी प्रसिद्ध आहे.
मी आज खानदेशी स्टाईल मध्ये शेव भाजी बनवत आहे .

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा टोमॅटो कट करून घ्या. दोन हिरवी मिरची कट करा. त्यात लसूण पाकळ्या, काळी,मिरी लवंग,दालचिनी, अद्रक हे सर्व साहित्य एकत्र करावं.
- 2
एका कढईमध्ये एक टेबल्स्पून तेल घेऊन वरील सर्व साहित्य कढाई मध्ये व्यवस्थित शिकून घ्या. कांदा ब्राऊन होईपर्यंत शेका.
- 3
वरील मसाला थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटा.
- 4
एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घ्या. त्यात जीरे -मोहरी हिंग घाला. वरील तयार मसाल्याची पेस्ट टाकून, तेल सुटेपर्यंत शेकून घ्या.
- 5
त्या पेस्टमध्ये लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला पावडर, मीठ व थोडे पाणी घालून शिजवून घ्या.
- 6
सर्व्ह करताना त्यामध्ये शेव घाला. व भाजी चपाती बरोबर सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या