फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व फळे धुवून घ्यावीत. नंतर सगळी फळे चिरून घ्या. डाळिंब सोलून त्याचे दाणे काढून घ्या. आता एक चमचा कस्टर्ड पावडर एका वाटीत काढून घ्या. त्यात तीन टेबलस्पून दूध घालून हलवून घ्या.
- 2
बाकीचे उरलेले दूध गरम करायला ठेवावे. त्यात साखर घालून हळुवारपणे वाटीत तयार केलेले कस्टर्ड दूध घालून सतत हलवत रहावे. गुठळी होता कामा नये.
- 3
यामध्ये आता दोन टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क घाला. एकसारखे ढवळत रहावे. दूध थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा.
- 4
दूध थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर यात एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घाला. चव खूप छान येते. आता यामध्ये चिरून घेतलेली फळे घालून हळुवारपणे मिक्स करावे.
- 5
त्यात आवडीनुसार काजू, बदाम, मनुका, वेलची पावडर घालून सर्व्ह करावे. थंड थंड मिक्स फ्रूट कस्टर्ड. हे कस्टर्ड लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीं सर्वांना आवडते.
- 6
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15726677


















टिप्पण्या