कसूरी मेथी ओनियन लसूणी पराठे (kasuri methi onion lasuni paratha recipe in marathi)

#EB1 #W1
#कसूरी_मेथी_ओनियन_लसूणी_पराठे
थंडी उबदार वातावरणात गरमागरम खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते. मेथीचे पौष्टिक पराठे खायची इच्छा झाली, बाहेर बाजारात जाऊन मेथीची ताजी जुडी आणायची होती, पण अचानक बाहेर पाऊस सुरु झाला. मग घरात असलेल्या कसुरी मेथीचे खमंग खरपूस भाजून पराठे बनवले. तव्यावर पराठे भाजताना लावलेलं तुप आणि बाहेर कोसळणार्या पावसाचा सुगंध मिक्स होऊन मस्त आरोमा म्हणजे खरपूस वास घरभर दरवळत होता.

कुकिंग सूचना
- 1
चपातीच्या पीठामधे कसूरी मेथी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात आणि ठेचलेलं आलं लसूण घालून मिक्स करावे. मग त्यात वरील तिखट, मसाले, तिळ आणि कलौंजी घालावी.
- 2
मिक्स केलेल्या पीठात कसूरी मेथी आणि मसाल्यांमधे लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
- 3
कसूरी मेथीचे पराठे लाटून तव्यावर थोडे तेल किंवा तुप घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.
- 4
खरपूस भाजलेल्या पराठ्यांना बटर लावून गरमागरम पराठे सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या