डाळ तांदळाचा ढोकळा (dal tandlacha dhokla recipe in marathi)

Vrunda Shende @Vrundacook_23365995
डाळ तांदळाचा ढोकळा (dal tandlacha dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तास भिजत ठेवले. त्यानंतर त्यातील पाणी निथळून घेतले. मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ-तांदूळ,हिरवी मिरची, कोथिंबीर, जीर आलं बारीक वाटून घेतली
- 2
डाळ तांदळाची पेस्ट चार ते पाच तास फॉर्मेट करण्याकरिता ठेवली. या पेस्टमध्ये किंचीत हळद,हिंग, तेल, साखर प्रमाणात मीठ घालून फेटून घेतले.
- 3
गॅसवर कढईत स्टॅन्ड ठेवून पाणी तापायला ठेवले. एका ताटाला तेल लावून करून घेतले. ढोकळा च्या मिश्रणामध्ये इनो घालून फेटून ताटा मध्ये घालून वीस मिनिटा करता स्टीम करायला ठेवले.
- 4
कढईमध्ये तेल तापवून मोहरी, कढीपत्ता हिरवी मिरची घालून तडका तयार करून घेतला. हा तडका ढोकळ्यावर पसरुन घेतला आणि वरून कोथिंबीर घातली.
- 5
तयार आहे आपला गरमागरम डाळ आणि तांदळाचा ढोकळा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15804465




टिप्पण्या (3)