मटार निमोना यूपी स्टाईल मटार उसळ (matar nimona recipe in marathi)

"मटार निमोना" यूपी स्टाईल मटार उसळ
यूपी आणि बिहार मधील, एक खास रेसिपी जी तिथे हिवाळ्यात अगदी आस्वाद घेऊन खाल्ली जाते,
एक परिपूर्ण आणि विंटर स्पेशल रेसिपी आज इथे तुमच्या सोबत शेअर करणार आहे, बनवायला एकदम सोपी,आणि पौष्टिक, चविष्ट अशी ही रेसिपी...
परिवाराकडून जर तारीफ आणि शाबासकी हवी असेल तर या थंडीत "मटार निमोना" यूपी स्टाईल उसळ नक्की करून बघा....चला तर मग पटकन रेसिपी बघूया....👌👌

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी वाटण करून घेऊया
त्या साठी एका मिक्सर च्या भांड्यात धने, कोथिंबीर, लसूण,मिरची आणि आलं घालून पेस्ट बनवून घ्या - 2
थोडे मटार बाजूला काढुन ठेवा आणि उरलेल्या मटार ची त्याच मिक्सर च्या भांड्यात मटार घालून त्याची ही ओबड धोबड पेस्ट करून घ्या
आणि बाजूला ठेवा - 3
त्याच एका कढई मध्ये तेल गरम करा आणि बटाटे उभे चिरून घ्या,आणि गरम तेलात फ्राय करून बाजूला काढून ठेवा
- 4
याच कढई मध्ये मटार ची पेस्ट घालून घ्या, आणि अगदी कोरडी होई पर्यंत सतत ढवळत राहावे आणि बाजूला काढून ठेवा
- 5
आता त्याच कढई मध्ये उरलेल्या तेलात जीरे हिंग घालून फोडणी करून घ्या, नंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो आणि मीठ घालून तेल सुटे पर्यंत आणि टोमॅटो मऊ होई पर्यंत शिजवून घ्या,नंतर त्यात हळद, लाल तिखट घालून मिक्स करा,नंतर यात बनवलेलं वाटण घालून मिक्स करा,
- 6
आणि ठेवलेले अख्खे मटार घालून घ्या,व्यवस्थित परतून घ्या, नंतर फ्राय केलेले बटाटे,आणि वाटलेले मटार आणि थोडस पाणी घालून वाफेत सर्व काही व्यवस्थित शिजू द्या
- 7
शेवटी गरम मसाला घाला, आणि 2 मिनटं शिजवून सर्व्ह करा...
"मटार निमोना"
भात किंवा रोटी, फुलका या सोबत भन्नाट लागतो...👌👌
Keywords
Similar Recipes
More Recipes
- अंड्याचा मार्बल केक (marble cake recipe in marathi)
- बीटरूट कटलेट्स विथ आवळा चटणी (beetroot cutlets with awla chutney recipe in marathi)
- मटार- वाटाणा उसळ (matar vatana usal recipe in marathi)
- हॉट चॉकलेट (hot chocolate recipe in marathi)
- ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक (dryfruit chocolate cake recipe in martahi)

टिप्पण्या (6)