साखरेची तिळ वडी (til vadi recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
साखरेची तिळ वडी (til vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे तूप टाकून पॅन गरम करण्यास ठेवणे आता त्यात साखर टाकावी.
दुसऱ्या एका कढईत तिळ खरपूस भाजून घेणे. - 2
मंद आचेवर साखर सतत एकसारखी हालवून वितळून घेणे.
साखर विरघळली की लगेच गॅस बंद करुन त्यात भाजून घेतलेले तिळ टाकणे. - 3
साखरेचे व तिळाचे मिश्रण एकजीव करून एका तूप लावलेल्या ठिकाणी ओतून अगदी झटपट गरम असतानाच सर्व मिश्रण लाटण्याने पसरून घेणे.
- 4
थोडे गरम असतानाच त्याच्यावर वडी चे मार्किंग करून घेणे.
आता थंड झाल्यावर अगदी कुरकुरीत साखरेची तिळ वडी तयार होते.🪁💟🪁
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15897161















टिप्पण्या