तंदुरी आलू (Tandoori Aloo recipe in marathi)

तंदुरी आलू (Tandoori Aloo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात पाणी गरम करुन त्यात थोडे मीठ घालून, एक उकळी आल्यावर बटाटे घालून ८०% शिजवून घ्यावे आणि जाळीवर थंड करण्यासाठी ठेवावे.
दुसरीकडे मॅरीनेशन साहित्य एकत्र करुन तयार ठेवावे.
- 2
मॅरीनेशन पेस्टमध्ये बटाटे, सिमला मिरची आणि कांदा यांचे तुकडे घालून नीट मिक्स करुन कोटींग करावे.
- 3
आता या मिश्रणावर, एका वाटीत गरम कोळश्याचे तुकडे आणि त्यावर १ चमचा तुप घालून मिश्रण ५-७ मिनीटे झाकून ठेवावे.
यामुळे कोळश्याचा अॅरोमा मिश्रणात मिसळून स्मोकी फ्लेवर येईल. - 4
नंतर एका टिक्का राॅडवर सिमला मिरची- कांदा - बटाटा असा सिक्वेन्स करत रॉड तयार करावे.
- 5
तयार रॉड एका पसरट तव्यावर तुप गरम करुन मध्यम- मोठ्या आचेवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे.
वर बटर लावून थोडावेळ डायरेक्ट गॅसवर भाजावे.
- 6
तयार तंदुरी आलू एका बाऊलमध्ये काढून त्यात चिरलेला कांदा, चाट मसाला, पुदीना चटणी, चिंच-खजूर चटणी, थोडा लिंबू रस आणि कोथिंबीर मिक्स करुन सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या (5)