मल्टीग्रेन कॉर्न आप्पे (Multigrain Corn Appe Recipe In Marathi)
#TBR
शाळा सुरू झाली का मुलांच्या डब्याचा प्रश्न नेहमीच उभा राहतो. पटकन होणारा आणि तब्येतीला पोषक असा आहार मुलांना द्यावा असे प्रत्येक आईला वाटते. आजची माझी रेसिपी ही मुलांच्या वाढीला पोषक अशा पदार्थांपासून बनवलेली आहे यामध्ये बी मुलांच्या आवडीचे मक्याचे दाणे, विविध प्रकारची पीठे यामध्ये तुम्ही घरात उपलब्ध असतील ती कुठेही वापरू शकता (चण्याचे मुगाचे, थालीपीठाचे, वड्याचे ,भाकरीचे इत्यादी). अगदी कमी तेलात पटकन होणारी ही रेसिपी मुलांना चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. घरी जर डोशाचे पीठ उरलेले असेल तर त्यामध्येही कोनसे दाणे आणि बाकीच्या भाज्या वापरून असे आप्पे तुम्ही देऊ शकता.

कुकिंग सूचना
- 1
एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये मिरची, थोडे जीरे आलं, लसूण टाकून जाडसर वाटून घ्या. हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेली सर्व पीठे,बारीक रवा त्यात घाला.
- 2
आता या मिश्रणामध्ये वर दिलेले सर्व मसाले आणि बारीक चिरलेल्या भाज्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, दही असे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करा. साधारण भज्याच्या पिठासारखे मिश्रण तयार करण्यासाठी त्यामध्ये अर्धा ते पाऊण कप पाणी घाला आणि दहा मिनिटे मिश्रण बाजूला ठेवून द्या.(रवा फुलून येण्यासाठी)
- 3
आता या मिश्रणामध्ये इनो चे एक पॅकेट मिक्स करून घ्या. दुसऱ्या बाजूला गॅस वर आप्पे पात्र गरम करायला ठेवून द्या. आप्पे पात्रामध्ये थोडेसे तेल घालून तयार केलेले मिश्रण त्यामध्ये घाला. वर झाकण ठेवून मंद आचेवर ७-८ मिनिटं एका बाजूने आणि मग आप्पे पलटून तीन ते चार मिनिटे दुसऱ्या बाजूने शिजवून घ्या.
- 4
हेल्दी मल्टीग्रेन कॉर्न आप्पे तयार सॉस किंवा चटणी बरोबर मुलांना तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या