ज्वारीचा हुरडा (Jowaricha Hurda Recipe In Marathi)

#LCM1
#ज्वारीचा_हुरडा
सुषमा कुलकर्णी ताईंची ज्वारीचा हुरडा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खूप छान लागला हुरडा.
डिसेंबर जानेवारी महिन्यात ज्वारीची कोवळी कणसं यायला लागतात. ती कोवळी कणसं भाजून खातात खूप छान लागतात. या कोवळ्या कणसांना हुरडा म्हणतात. शेतामधे एकत्र जमून सगळ्यांबरोबर हुरडा पार्टी करण्याची गंमत काही औरच असते.

कुकिंग सूचना
- 1
कोवळा हुरडा एका तव्यावर घालून मंद आचेवर जरा परतून घ्यावा.
- 2
मग त्यात थोडे तेल घालून हुरडा परत मंद आचेवर परतून घ्यावा.
- 3
छान खरपुस भाजुन घेतलेल्या हुरड्यावर मीठ, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी आपल्या आवडीनुसार घालून मिक्स करावे. वरुन लिंबू पिळून घालून कोथिंबीर घालावी. मस्त चटपटीत हुरडा खायला खूप छान लागतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)