बेसन पेरून कांदा पात भाजी (Besan Perun Kanda Paat Bhaji Recipe In Marathi)

Deepa Gad @cook_20313774
खरंतर मी हिरवी मिरची, कांदा, ओलं खोबरं घालून कांदा पातीची भाजी बनवते. पण आज म्हटलं बेसन पेरून करून बघू या. खूप मस्त झालीय....
बेसन पेरून कांदा पात भाजी (Besan Perun Kanda Paat Bhaji Recipe In Marathi)
खरंतर मी हिरवी मिरची, कांदा, ओलं खोबरं घालून कांदा पातीची भाजी बनवते. पण आज म्हटलं बेसन पेरून करून बघू या. खूप मस्त झालीय....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन भाजून घेऊन बाजूला काढा.
- 2
कढईत तेल घालून जीरे, हिरवी मिरची, कांदा परतुन त्यात चिरलेली कांदा पात, मसाला, मीठ घाला. कांदा पात शिजली की त्यात भाजलेले बेसन घाला. एकजीव करून शिजू द्या.
- 3
पाच मिनिटाने गॅस बंद करा. तयार आहे बेसन पेरून कांदा पात भाजी... ही भाजी भाकरी, चपातीबरोबर खाऊ शकता.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16729818

टिप्पण्या (3)