संक्रांत स्पेशल तिळाची फुलदाणी (Tilachi Fuldani Recipe In Marathi)

#TGR तीळाचे लाडू तर आपण मकर संक्रांतीला बनवतोच. पण हळदीकुंकू समारंभात प्रत्येक काला आकर्षित करेल अशी भन्नाट कल्पना... करून तर बघा.. लहानमुलांना ही मजा येईल...

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस मंद आचेवर ठेवून त्यावर एका पॅन मध्ये १ कप साखर घेऊन ती पूर्ण पणे विरघळेपर्यंत म्हणजे पाक बनेपर्यंत चमचा ने ढवळत रहा. आता त्यात तीळ घालून ते मिश्रण पुन्हा एकदा ढवळून गरमच एका सपाट भागाला किंवा पोळपाट ला तेल लावून हे गरम मिश्रण ओतून वाटीच्या साहाय्याने थापा.. व लाटण्यासाठी तेल लावून पटकन लाटून घ्या.
- 2
आता त्याला परडीचा आकार देण्यासाठी एका मोठ्या वाटीत हे लाटलेली पोळी घालून त्याला परडीचा आकार द्या. नंतर त्याच प्रमाणे थोडा साखरेचा पाक बनवून त्यात तीळ घालून त्या गरम मिश्रणाचे हॅंडल बनवून गरम पाकाने चिटकून घ्या.
- 3
आता फुलं पान बनवण्यासाठी वरीलप्रमाणे साखरेचा पाक आणि तीळ ह्या चे गरम मिश्रण लाटून त्याला फुलाचा व पानांचा आकार द्या. काही फुलं वेगळ्या रंगाची बनवण्यासाठी मिश्रण बनवताना च त्यात खाण्याचा रंग बनवून फूल पान बनवा.
- 4
आता फुलांच्या मागील देठासाठी टूथपिकचा वापर करा. आता हे सर्व परडीत सजवून घ्या.
- 5
तयार तिळाची पान फुलांनी भरलेली फुलदाणी...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (9)