खव्याच्या पोळ्या (Khavyachya polya Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम खवा कुस्करून घ्यावा. आता गॅस वर कढई ठेवून,खवा घालून चांगला परतून घ्यावा लाल होईपर्यंत.
- 2
त्यानंतर खवा एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवावा. एका बाजूला गव्हाचे पीठ मळून घ्यावे. पिठामध्ये तेल आणि थोडे चिमूटभर मीठ घालून गोळा मळून घ्यावा. आता खव्यामध्ये पिठी साखर घालून चांगले मिक्स करून घ्यावे. पिठीसाखर कमी जास्त आपल्या आवडीनुसार घ्यावी. आता त्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालावी आणि चांगले मिक्स करावे.
- 3
त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून घ्यावे. एक गोळा घेऊन वाटीच्या आकार देऊन त्यामध्ये खवा घालावा, साधारण 3 टेबलस्पून मावेल इतका. आता हळूहळू बंद करावा आणि त्याची गोल पोळी लाटावी. बारीक गॅस करून तवा गरम करून घ्यावा आणि झालेली पोळी तव्यावर टाकावी.
- 4
एका बाजूला भाजल्यानंतर पलटून घ्यावे आणि भाजलेल्या पोळी वर सर्व बाजूंनी तूप घालावे. दुसऱ्या बाजूलाही तसेच करावे. खव्याची पोळी तयार झाली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या (2)