पोहा कचोरी

हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे.
पोहा कचोरी
हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे स्वच्छ धुऊन पाण्यात भिजवून घेतले. ब्रेडला मिक्सरवर बारीक करून घेतले. एका वाडग्यात पोहे व ब्रेड मिक्स करून त्यात जिरे पावडर व मीठ मिक्स केले व त्याचा गोळा बनविला.
- 2
आता स्टफिंग साठी बटाटे उकडून स्मॅश करून घेतले. स्वीट कॉर्न वाफवून मिक्सर मध्ये क्रश करून घेतले. कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतले. धणे जीरे बडीशोप मिक्सरवर बारीक करून घेतले.
- 3
बेसन भाजून घेतले. एका वाडग्यात स्मॅश केलेला बटाटा, क्रश कॉर्न, वरील बारीक केलेला मसाला हे मिक्स करून घेतले.मग तिखट मीठ हळद गरम मसाला साखर लिंबाचा रस घालून स्मॅश केले.
- 4
सर्व साहित्य मिक्स करून त्याचा गोळा बनवला. पोह्याचे या मिश्रणाची पारी बनवून त्यात वरील सारणाचा लहान गोळा स्टफ करून त्याला गोल कचोरीचा आकार देऊन ग्रीसिंग केलेल्या अप्पे पात्रात ठेवून कचोरी बनवून घेतली. सर्व बाजूंनी शेकण्यासाठी ती जरा गोल फिरवत जावी.
- 5
सर्व बाजूंनी पोहा कचोरी शेकल्यावर ती डिश मधे काढून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या