मासवडी रस्सा (Maswadi rassa recipe in marathi)

एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश जो मुख्यतः बेसन किंवा बेसन, मसाला, कांदा, नारळ, धणे आणि लसूण यांचा वापर करून मुख्यतः पुणे, मराठवाडा प्रदेशात तयार केला जातो. नारळ-कांदा-लसूण पेस्ट, कोल्हापुरी करी मसाला किंवा गोडा मसाला किंवा गरम मसाला आणि काही मसाल्यांचा वापर करून तयार केलेल्या करी किंवा ग्रेव्हीसोबत मासवडी नेहमी दिली जाते. हे गरम सर्व्ह केले जाते आणि भाकरी किंवा चपाती बरोबर चांगले जाते.

कुकिंग सूचना
- 1
सारण बनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं आणि खसखस कोरडीच, निरनिराळी भाजून घ्यावी. गार झाले कि मिक्सरमध्ये सरसरीत दळून घ्यावे..
- 2
कढईत तेल गरम करून त्यातहींग हळद घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली लसूण घालून परतावे. कांदा चांगला परतला गेला कि बाजूला काढून ठेवावा आणि गार झाला कि मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना घरगुती लाल तिखट आणि मीठही घालावे. वाटलेले कांद्याचे मिश्रण आणि तीळ सुकं खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करावे. चव पाहून लागेल ते जिन्नस घालावे.
- 3
सारण तयार झाले कि आवरण बनवायला घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यातहींग, हळद, जीरे, लसूण आणि हिरवी मिर्च पेस्ट घालून परतून घ्यावे. एका मोठ्या बाउल मध्ये पानी घालावे. पाण्यात मीठ घालावे. त्यात बेसन घालून पाण्यात बेसन पीठ नीट मिक्स करून घ्यावे. गुठळ्या होवू देउ नयेत. फोडणीमध्ये बेसन पीठ आणि पानी मिक्स केलेले मिश्रण टाकावे मध्यम आचेवर २-३ वाफा काढाव्यात. पीठ शिजले पाहिजे. वाटल्यास थोडे खावून पहावे. कच्चट लागत असेल तर अजून थोडावेळ शिजू द्यावे किंवा पीठ हाताला चिकटत नाही हे बघावे ्
- 4
पीठ शिजले कि कोमट होवू द्यावे. नंतर हातानेच कॉटनच्या कपड्यांवरं मध्यमसर थापावे. यावर तयार सारणाचा पातळ थर द्यावा आणि घट्ट सुरळी करावी. शेवटचे टोक नीट चिकटवावे. वड्या पाडाव्यात.
- 5
कढईमध्ये तेल तापवावे त्यात मोहरी, जीरे आणिहींग घालावे आणि घरगुती मसाला घाला आणि मिनिटभर परतवा. कांदा लसुण खोबरे वाटण आणि उरलेले सारण घालून मिक्स करावे. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे. रस्सा बनवण्यासाठी पानी घाला. पानी घातल्यावर मोठ्या आचेवर रस्सा उकळून घ्या. त्यानंतर कढईला लागलेली खरवड,मीठ व कोथिंबीर घालून चांगले मंद गॅसवर पाच मिनिटे उकळून घेणे. मासवडी रस्सा तयार आहे.
वड्यांवर रस्सा टाकून बाजरीची भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर त्याचा आनंद घ्या. - 6
हा पदार्थ शिजवायला थोडे अवघड आहे पण चवीला अप्रतिम आहे. आणि जर चव चांगली असेल तर सर्वकाही योग्य आहे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)