गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi)

गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुशी माष्या चे तुकडे चोळून धुऊन एका टोपात घेऊन त्यात एक चमचा हळद आणि लिंबू रस,एक चमचा मीठ घालून त्याच्या अंगावर चोळून लावावे आणि एक तास टोप झाकून ठेवावे.
- 2
आता कांदा लसूण आले खोबरे भाजुन घ्यावे आणि आखे गरम मसाले पण भाजुन चां बारीक वाटण तयार करून ठेवावे.आले लसूण पेस्ट पण तयार करून ठेवावे. आता एक तास टोपात ली मुशी ला जास्त पाण्याने चोळुन धुऊन घ्यावे. नंतर आले लसूण पेस्ट लाऊन ठेवावे आता एका टोपात तेल गरम करावे आणि त्यात वाटण तेल सुटेपर्यंत परतावे नंतर सगळे मासाले, मीठ घालून हलवून घ्यावे आणि नंतर मासे घालून हलवून घ्यावे आणि नंतर त्यात एक प्याला पाणी घालून मासे रस्सा तीन ते चार मिंट उकळत ठेवावे नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा वें.
- 3
आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम झनझनित गावरान मुशी च कालवण खायाला घ्यावें
Similar Recipes
More Recipes









टिप्पण्या