तांबड्या भाजीचे सासव

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.

#ngnr
बऱ्याच वर्षांखाली मी माझ्या गोव्याच्या मैत्रिणीकडे तिच्या घरी गेले होते तेव्हा तिच्या आईने झटपट तांबड्या भाजीचे सासव बनवले होते. मला पहिल्यांदा कळलंच नाही की ही कसली चटणी आहे! नंतर समजल्यावर आश्‍चर्याचा एक सुखद धक्काच बसला. विशेष म्हणजे या तोंडीलावण्यात ना कांदा आहे ना लसूण! पण चवीला तरीही अप्रतिम लागणारी अशी ही डिश आहे.
पालेभाज्या खूप शिजवू नये म्हणतात त्या गोष्टीला पुरेपुर उतरणारी ही रेसिपी आहे. फक्त एका वाफेमध्ये ही भाजी शिजवून घेतली आहे, त्याचे पाणीही आटवले जात नाही. तसंच, वाटण कच्चंच घेतलंय. वाटणामुळे भाजीचा पातळपणा कमी होतो आणि भाजी पानात वाढल्यावर इकडे तिकडे पळत नाही.
सासव म्हणजे मोहोरी! वाटणामध्ये असलेल्या कच्च्या मोहोरी चा एक वेगळा सुगंध ह्या चटणीवजा भाजीला लागतो आणि खाताना स्वर्ग सुख लाभते! पाहूया तर मग रेसिपी ..

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

१० मिनिटं
२ - ३ जणांना
  1. 1मोठ्ठा बाऊल निवडून, धुवून, बारीक चिरलेली लाल माठाची पालेभाजी
  2. 1/2 छोटा चमचातेल
  3. 1/4 छोटा चमचाहिंग
  4. 1छोटी हिरवी मिरची
  5. चवीनुसारमीठ
  6. सासवाचे वाटणः
  7. 2छोटे चमचे ओलं खोबरं
  8. 1छोटी हिरवी मिरची
  9. 1/2 छोटा चमचाआलं तुकडे करून
  10. 1/2 छोटा चमचाजिरं
  11. 1/2 छोटा चमचामोहोरी
  12. वरून घालायच्या फोडणीसाठीः
  13. 1/2 छोटा चमचातेल
  14. 1/4 छोटा चमचामोहोरी
  15. चिमूटभरहिंग
  16. 4-5कडिपत्त्याची पाने

Cooking Instructions

१० मिनिटं
  1. 1

    सगळ्यात आधी सगळ्यात आधी लाल माठाची पालेभाजी निवडून, स्वच्छ धुऊन, बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    नंतर एका कढल्यात अर्धा चमचा तेलाची हिंग, हिरव्या मिरचीची फोडणी करून मीठ घालून भाजीला चांगली वाफ आणावी.

  3. 3

    भाजी हलकीशी शिजली की गॅसवरून उतरवून बाजूला एका वाडग्यात काढून ठेवावी. लक्षात असू द्या की भाजी आपल्याला आटवायची नाहीये.

  4. 4

    वाटणासाठीचे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

  5. 5

    तयार वाटण कच्चंच भाजीच्या वाडग्यात कालवून भाजी एकजीव करावी.

  6. 6

    नंतर फोडणीच्या पळीत अर्धा चमचा तेलाची हिंग, मोहोरी, कढीपत्त्याची फोडणी करून ती तयार भाजीवर ओतावी.

  7. 7

    आपले झटपट तांबड्या भाजीचे सासव आहे. हे तोंडीलावणे म्हणून भात / चपाती बरोबर सर्व्ह करावे.

Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
शर्वरी पवार - भोसले
on
दुबई, युएई.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
Read more

Comments (4)

Similar Recipes