साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

#पश्चिम
#महाराष्ट्र
साबुदाणा वडा ज्याला सागोवडा सुद्धा म्हटले जाते. साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक अल्पाहार आहे. उपवासाच्या दिवसात महाराष्ट्रात विशेषतः नवरात्री महोत्सवात साबुदाणा वडे बनवले जातात. साबुदाणा वडा माझ्या मुलाला तर प्रचंड आवडतो लहानापासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना भरपूर आवडतो. लहानपणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा जास्त खाता यावा म्हणून मी सुद्धा उपवास करायची

कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा स्वच्छ धुवून,त्यातील पाणी काढून टाकावे,व बाऊलमध्ये हा साबुदाणा घेऊन साबुदाणा बुडेल एवढेच पाणी ठेवावे. हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवावा, कमीत कमी सहा तास साबुदाणा भिजला पाहिजे. बटाटे शिजवून घ्या,शेंगदाणे भाजून त्याची साले काढून घ्या, आता बाउल मध्ये साबुदाणा घेऊन त्यावर एक हात फिरवून घ्यावा. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची शेंगदाण्याचा जाडसर कूट, मीठ,जिरे, किंचीत साखर घालून सगळे व्यवस्थित मिक्स करावे.
- 2
त्यानंतर त्यात बटाटा कुस्करून घालावा व व्यवस्थित मिक्स करून त्याचे छोटे छोटे वडे करून घ्यावे.
- 3
गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल घालावे,तेल गरम झाले की त्यात हे साबुदाणा वडे, व्यवस्थित तळून घ्यावे.
- 4
चटणीसाठी अर्धा कवड ओला नारळ, पाच हिरव्या मिरच्या, आणि मुठभर कोथिंबीर व चवीनुसार मीठ घेऊन हे सर्व एकत्र मिक्सरला फिरवून घ्यावे, ही चटणी साबुदाणा वडा बरोबर खूप छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या