स्मोकी अख्खा मसुराची आमटी (smoky akha masoorchi amti recipe in marathi)

अख्या मसुराची आमटी आपण सगळेच करतो पण ही मसुराची आमटी जरा खास आहे.... चवीला अगदी सुंदर तसेच करायला अगदी सोपी आहे. या मसुराची आमटी ला चव अगदी धाबा स्टाइल येते.... #ccs
स्मोकी अख्खा मसुराची आमटी (smoky akha masoorchi amti recipe in marathi)
अख्या मसुराची आमटी आपण सगळेच करतो पण ही मसुराची आमटी जरा खास आहे.... चवीला अगदी सुंदर तसेच करायला अगदी सोपी आहे. या मसुराची आमटी ला चव अगदी धाबा स्टाइल येते.... #ccs
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तेल घेऊन त्यात कढीपत्ता टाकावा बारीक चिरलेला एक कांदा टाकावा व छान परतून घ्यावा गुलाबी होईपर्यंत.
- 2
त्यात कांदा-खोबऱ्याचं वाटण टाकावं व आलं लसून पेस्ट आणि मिरची कोथिंबीर पेस्ट टाकावी व छान परतून घ्यावी कडेने तेल निघेपर्यंत.
- 3
आता मिश्रणात हळद तिखट गरम मसाला सगळे घालून छान परता वे नंतर त्याच्यात मोडलेल्या मसुरा घालाव्या व लागेल तसे पाणी घालून घ्यावे जरा घट्टसरच ठेवाव्या.
- 4
एक उकळी काढून मसुरा शिजेपर्यंत वाट बघावी नंतर त्यात कोकम,गुळाचा खडा व मीठ टाकावे. शेवटी वरून कोथिंबीर घालावी.
- 5
स्मोक देण्यासाठी कोळशाचा तुकडा गरम करून लाल करून घ्यावा. एक वाटी मसुराच्या आमटीत ठेवावी त्यात हा गरम केलेला कोळशाचा तुकडा ठेवावा.
- 6
त्यावर ती उभी चिरलेली मिरची ठेवावी व तूप किंवा बटर टाकून झाकण ठेवून द्यावं दूर येईल तो त्याच्या आत मध्ये कोंडून द्यावा.
- 7
अशी ही एकदम सोपी आणि चवीला सुंदर अशीच मोठी मसुराची आमटी तयार आहे वाटीत देताना त्याच्यावर बटर टाकल्यास स्वाद दुप्पट होतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
- काबुली चणा ग्रेव्ही मसाला (kabuli chana gravy masala recipe in marathi)
- काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi)
- कॉर्न विथ मटकी भेळ (corn with matki bhel recipe in marathi)
- कांदा पोहा (kandha poha recipe in marathi)











टिप्पण्या