आंबा बाठीच्या गराचे सार(Amba Baathichya Saar Recipe In Marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

आंबा खाऊन झाल्यावर त्याच्या बाठीला किंवा सालींना बराच गर लागलेला असतो.त्याचा वापर बरेचजण वेगवेगळ्या पदार्थात करतात किंवा काही बाठी आणि साल न वापरता अशीच फेकून देतात.त्यासाठी ही रेसिपी देत आहे ,जी विदर्भात बऱ्याच घरांमध्ये आवर्जुन केली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१-२
  1. 1आंब्याची बाठी व साले
  2. 1 कपपाणी
  3. 1 टीस्पूनतूप
  4. 1/4 टीस्पूनमोहरी जीरे
  5. चिमूटभरहिंग
  6. 1/4 टीस्पूनमिरेपूड
  7. 1/4 टीस्पूनमीठ....आवडीनुसार कमी जास्त
  8. 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर..आवडत असल्यास

कुकिंग सूचना

  1. 1

    आंबा खाऊन झाला तरी त्याच्या बाठी आणि सालिंमध्ये बराच गर असतो. त्या पाण्यात १०-१५ मिनीटे भिजत ठेवल्या.

  2. 2

    १५ मिनिटांनंतर बाठी आणि साले पाण्यात नीट चोळून त्याचा गर काढून घेतला.

  3. 3

    पातेल्यात तूप गरम करून त्यात जीरे, मोहरी,हिंग घालून फोडणी केली.फोडणीत तयार गर घालून नीट ढवळून घेतले.

  4. 4

    साराला छान उकळी येऊ दिली.मग त्यात मीठ आणि मिरेपूड घातली. मिरेपूड आवडत नसेल तर फोडणीत मिरची किवा लाल तिखट घातले तरी छान लागते. सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर घातली.

  5. 5

    ५-७ मिनिटांत सार तयार होते. जेवणाच्या आधी नुसतेच प्यायला किंवा भातासोबत सार छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes