साऊथ इंडियन टोमॅटो पुलाव (tomato pulao recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#GA4 #Week8 #pulao आपल्याकडे पुलाव सर्व भाज्या किंवा मोड आलेले कडधान्ये वापरून केला जातो पण मी आज साऊथ इंडियन टोमॅटोचा पुलाव केला आहे कसा? चला तर तुम्हाला दाखवते कसा करायचा ते

साऊथ इंडियन टोमॅटो पुलाव (tomato pulao recipe in marathi)

#GA4 #Week8 #pulao आपल्याकडे पुलाव सर्व भाज्या किंवा मोड आलेले कडधान्ये वापरून केला जातो पण मी आज साऊथ इंडियन टोमॅटोचा पुलाव केला आहे कसा? चला तर तुम्हाला दाखवते कसा करायचा ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ व्यक्ति साठी
  1. १०० ग्रॅम वाडा कोलम तांदुळ
  2. 1कांदा उभा चिरलेला
  3. 2-3टोमॅटो मोठे चिरलेले
  4. 1/2 टिस्पुनमोहरी
  5. 1 टिस्पुनजीरे
  6. 1 पिंचहिंग
  7. 5-6कडिपत्याची पाने
  8. 1 टिस्पुनचनाडाळ
  9. 1 टिस्पुनउडीदडाळ
  10. 1/4 टिस्पुनहळद
  11. 2मिरच्या उभ्या चिरलेल्या
  12. 1 टिस्पुनकाश्मिरी तिखट
  13. 1 टेबलस्पुनघरगुती मसाला
  14. 2-3लवंगा
  15. २-४ मिरीचे दाणे
  16. 1-2तमालपत्रे
  17. चविनुसार मीठ
  18. आवश्यकतेनुसार गरमपाणी
  19. कांद्याच्या रिंगा व लिंबाच्या फोडी पुदिना
  20. 1 टिस्पुनसाजुक तुप
  21. 1-2 टिस्पुनआल लसुण पेस्ट

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    तांदुळ स्वच्छ धुवुन१५-२० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा कांदा टोमॅटो चिरून ठेवा फोडणीचे पदार्थ डिश मध्ये काढुन ठेवा

  2. 2

    मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग कडिपत्ता चनाडाळ उडीदडाळ मिरी लवंगा तमालपत्र उभ्याचिरलेल्या मिरच्या टाकुन परता नंतर उभा चिरलेला कांदा वआलं लसुण पेस्ट चांगली परतुन कांदा लालसर होईपर्यत परता

  3. 3

    नंतर त्यात घरगुती मसाला व काश्मिरी तिखट हळद व टोमॅटो टाकुन परतुन ५ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा

  4. 4

    मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात भिजवलेले तांदुळ टाका व परतुन घ्या

  5. 5

    परतलेल्या तांदुळात मीठ व गरमपाणी टाकुन भात शिजवा नंतर पाणी आटत आल्यावर झाकण ठेवुन शिजवा.

  6. 6

    गरमगरम टोमॅटो पुलाव डिश मध्ये सर्व्ह करा सोबत लिंबाचे काप व कांद्याच्या रींग देत येतील वरून थोड साजुक तुप सोडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes