वडापाव (vada pav recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#स्नॅक्स
3. बुधवार - वडापाव
वडापाव म्हटलाकी सगळ्यांचाच फेव्हरेट आहे.
आणि थंडीच्या सीझनमध्ये वडापाव खाण्याची तर खूपच मजा येते... आम्ही न्यू स्टाईल मध्ये वडापाव बनवला आहे आपण साधारण वडापाव बटाट्याचं बनवत होतो पण मी आज कच्चा केळी पासून बनवला आहे आणि बेसन पिठाची कोटिंग न करता उडदाच्या डाळीचे कोटिंग केली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा .

वडापाव (vada pav recipe in marathi)

#स्नॅक्स
3. बुधवार - वडापाव
वडापाव म्हटलाकी सगळ्यांचाच फेव्हरेट आहे.
आणि थंडीच्या सीझनमध्ये वडापाव खाण्याची तर खूपच मजा येते... आम्ही न्यू स्टाईल मध्ये वडापाव बनवला आहे आपण साधारण वडापाव बटाट्याचं बनवत होतो पण मी आज कच्चा केळी पासून बनवला आहे आणि बेसन पिठाची कोटिंग न करता उडदाच्या डाळीचे कोटिंग केली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
पाच व्यक्ती
  1. 100 ग्रॅमउडदाची डाळ भिजवून बारीक दळलेली
  2. 5कच्ची केळी शिजवलेली
  3. 1/2 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1गाजर बारीक चिरलेला
  5. 1सिमला मिरची
  6. आवडीप्रमाणे हिरवी मिरची अद्रक ची
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनधणे-जीरे पूड
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1/2लिंबूचा रस
  12. थोडीशी साखर ऑप्शनल आहे
  13. तळण्यासाठी तेल
  14. फोडणी करण्यासाठी थोडेसे तेल
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. चिमुटभरहिंग
  17. 5मिनिटे उकळून घेतलेले हिरवे वटाणे
  18. लसणाची चटणी बनवण्यासाठी
  19. पंधरा-वीस लसणाच्या कळ्या
  20. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  21. 100 ग्रॅमशेंगदाणे
  22. चवीनुसारमीठ
  23. थोडीसीहिंग
  24. चिमुटभरहळद
  25. 1 टीस्पूनजीरे
  26. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्वप्रथम उडदाच्या डाळीला व्यवस्थित दोन पाण्याने धुऊन दोन तासापर्यंत भिजवून घ्या त्यानंतर बारीक पेस्ट बनवून घ्या. सर्व व्हेजिटेबल्स, बारीक किसलेली कच्ची केळी शिजवलेली आणि सर्व मसाले एकत्र करून तयार करून मिक्स करा.

  2. 2

    एक कढई गरम करून घ्या त्यामध्ये थोडे तेल टाका गरम झाल्यावर हळद टाकून गॅस बंद करून घ्या हळद तेल जे तयार केलेलं कच्चा केळीचे पूरण मध्ये मिक्स करून छानसा मसाला तयार करून घ्या

  3. 3

    मसाल्याचे छोटे-छोट लहान बॉल स बनवून घ्या. उडदाच्या डाळीचे पेस्टमध्ये मीठ टाकून बॅटर रेडी करून घ्या.

  4. 4

    कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर उडदाच्या डाळीचे बॅटरमध्ये बॉल स डीप करून तळून घ्या

  5. 5

    एका बाजूने झाल्यावर दुसरी साईडने पलटून घ्या आणि मस्त गोल्डन ब्राऊन अशी फ्राय करून घ्या.

  6. 6

    शेंगदाणे चटणी बनवण्यासाठी मिक्सर पॉटमध्ये शेंगदाणे,लसून, लाल तिखट,हळद, हिंग, जीरे, मीठ टाकून मिक्सर चालू बंद करून एकदा तपासून घ्या झाल्यावर ते तेल टाकून अजून एकदा मिक्सरमधून फिरवा अशीही लसणाची चटणी तयार करून घ्या पावाच्या मध्यभागी दोन भाग करून चिंचेची गोड चटणी आणि हिरवी चटणी लावून मध्यभागी वडा ठेवून वरून लसणाची चटणी बारीक चिरलेला कांदा टाकून तयार आहे.

  7. 7

    गरमागरम असा वडापाव आपला तयार आहे हा खूपच टेस्टी असा बनतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes